0

NAVAVI MARATHI 6.PREMSWARUP AAI (6.प्रेमस्वरूप आई)

"'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे आईच्या मोठेपणाबद्दल गुणगान केले आहे."

2 years ago 34 min read

   

NAVAVI MARATHI 6.PREMSWARUP AAI (6.प्रेमस्वरूप आई)-1


 

इयत्ता - नववी 

विषय - मराठी 

राज्य - कर्नाटक

6.   प्रेमस्वरूप आई

कवी – माधव ज्युलियन

पूर्ण नाव – माधव त्रिंबक पटवर्धन

रविकिरण या प्रसिद्ध कविमंडळाचे सभासद.

'प्रणय पंढरीचे वारकरी' असे त्यांना संबोधण्यात येते.

इंग्रजी व फारसी भाषेचे ते प्राध्यापक होते.

खंडकाव्ये - ‘विरहतरंग’, ‘नकुलालंकार’, ‘सुधारक'

कवितासंग्रह  - 'स्वप्नरंजन', 'तुटलेले दुवे', 'मधुलहरी' इत्यादी

      प्रेमस्वरूप आई ही कविता 'गज्जलांजली' या पुस्तकातून घेतली आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे आईच्या मोठेपणाबद्दल गुणगान केले आहे.

 

शब्दार्थ :
आबाळ होणे - हेळसांड होणे
हेका - हट्ट
जाच - त्रास
चित्ती - मनात
वियोग - ताटातूट
उल्का - तारका
विदेह - देहरहीत
ब्रह्मांड आठवणे - खूप दुःख होणे
वात्सल्य - प्रेम
माया - ममता
ठसावे - स्थिर होणे
सिंधु - समुद्र,
स्वाध्याय :
प्र.1 ला - खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) माधव ज्युलियन या मंडळाचे सभासद होते.
(अ) साहित्य मंडळ
(
ब) साहित्य अकादमी
(
क) रविकिरण मंडळ
(
ड) चंद्रकिरण मंडळ
उत्तर -(क) रविकिरण मंडळ
(
आ) 'सुधारक' या पुस्तकाचा साहित्य प्रकार हा आहे.
(अ) खंडकाव्य
(
ब) सुनीत काव्य
(
क) विडंबन काव्य
(
ड) नाटक

उत्तर - (अ) खंडकाव्य

(इ) कवीचा जीव याचा हेका सोडीना

NAVAVI MARATHI 6.PREMSWARUP AAI (6.प्रेमस्वरूप आई)-3

Also read KTBS Class 8 English (TL) 1 'Rain in Summer'


(अ) विद्या हवी
(
ब) आई हवी
(
क) धन हवे
(
ड) वडील हवे

उत्तर (ब) आई हवी

(ई) काय सोडून उल्के समान वेगाने ये असे म्हंटले आहे.
(अ) कैलास
(
ब) आकाश
(
क) हिमालय
(
ड) स्वर्ग

उत्तर - (अ) कैलास

 

प्र.2 रा खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(अ) कवी माधव ज्युलियनना काय म्हणून संबोधण्यात येत असे?

उत्तर - कवी माधव ज्युलियनना 'प्रणय पंढरीचे वारकरी' म्हणून संबोधण्यात येत असे

(आ) कवीचे पूर्ण नाव लिहा.

उत्तर - कवीचे पूर्ण नाव माधव त्रिंबक पटवर्धन असे आहे.

(इ) विद्याधनप्रतिष्ठा लागूनसुद्धा कवी पोरकाच का?

उत्तर - विद्या धन प्रतिष्ठा लाभूनसुद्धा कवीला आई नाही म्हणून कवी पोरका आहे.

(ई) भूक पोरक्याची शांत का होत नाही ?

उत्तर -भूक पोरक्याची आईविना शांत होत नाही.

प्र. 3 रा खालील प्रश्नांची तीन किंवा चार वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कवीला ब्रह्मांड का आठवत आहे?

उत्तर - कवीला जीवनात सर्व काही मिळाले.पण प्रेम देणारी,वात्सल्य देणारी,जवळ

करणारी आई मिळाली नाही त्यामुळे कवीला ब्रम्हांड आठवत आहे.

(आ) वात्सल्यसिंधु असे कोणाला व का म्हटले आहे?

उत्तर- वात्सल्यसिंधु असे कवीने आईला म्हटले आहे. कारण आई ही प्रेमाचा

जिव्हाळा,प्रेमाचा मोती व वात्सल्येचा समुद्र आहे.असे माधव ज्युलियन म्हणतात

(इ) दुसऱ्यांचे वात्सल्य पाहून कवीला काय वाटते?

उत्तर - दुसऱ्यांचे वात्सल्य पाहून कवीला असे वाटते की, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.जेव्हा दुसऱ्याची आई आपल्या मुलाला माया करते,तेव्हा मी पोरका झालो आहे असे कवीला वाटते.

 

प्र. 4 ( था ) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

(अ) "आईविणेपरी मी हा पोरकाच राही "
संदर्भ - वरील काव्यपंक्ती माधव ज्युलियन लिखित 'प्रेमस्वरूप आई' या कवितेतील असून त्याचे मूल्य मातृप्रेम आहे.

Also read इयत्ता १० वी समाज विज्ञान भाग - 1 संपूर्ण मार्गदर्शन: पाठ्यपुस्तक उत्तरे आणि अभ्यास साहित्य


स्पष्टीकरण - कवीची आई जिवंत नसल्याने त्याला पोरकेपणा वाटतो.आपल्यावर प्रेम करणारे वात्सल्याने जवळ करणारी,कोणी नाही म्हणून वाईट वाटते.असे वरील ओळीतून कवी सांगत आहेत.
(
आ) "नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे!
संदर्भ - वरील काव्यपंक्ती माधव ज्युलियन लिखित 'प्रेमस्वरूप आई' या कवितेतील असून त्याचे मूल्य मातृप्रेम आहे.
स्पष्टीकरण - आईच्या आठवणीने कवीचे मन व्याकूळ झाल्यावर वरील ओळीतून कवी म्हणतात की,आई तुझ्याकडे पाहून असावे,तुला डोळे भरून पहावे आणि तुझे रुप चेहरा माझ्या मनात कायमचा साथ राहील अशा रीतीने तुला मनात साठवावे.की ज्याचा विसर मला कधीच पडणार नाही.
प्र. 5 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) मातेच्या वियोगाने आणि आठवणींने येणारी व्याकुळता?
उत्तर - आपली आई आपल्या आयुष्यात पुन्हा भेटणार नाही.याचे कवीला दुःख होत आहे.माझ्यावर प्रेम करणारी, जीव लावणारी,कोणी नाही मी पोरका झालो आहे.असे कवीला वाटते.तुला पुन्हा भेटण्याची माझी ही भूक तू भागवावी असे आपल्या प्रेमस्वरूप आणि वात्सल्यसिंधू आईला विनंती करत आहे.कवीला आईचा वियोग सहन होत नसून तिच्या संगतीत राहावे,हसावे,जीवन व्यतीत करावे असे वाटते.
(
आ) अव्यक्त अश्रुधारा म्हणजे काय?
उत्तर - कवीची आई त्याच्यासमोर नाही.ती जिवंत नाही परंतु कवीला त्याची आई शरीर नसले तरी तिच्या आत्म्याच्या रूपाने त्याच्या अवतीभवती फिरून त्याच्यावर प्रेम करते आहे असे वाटते.ती दिसत नाही किंवा तिचा चेहराच आठवत नाही.त्यामुळेच तिचे प्रेमाश्रू,तिच्या अश्रूधाराही त्याला दिसत नाहीत.यालाच अव्यक्त अश्रुधारा असे म्हणतात.

 
भाषाभ्यास :
(
अ) खालील ओळीतील अलंकार ओळखा व लक्षणे सांगा.
(अ) प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
NAVAVI MARATHI 6.PREMSWARUP AAI (6.प्रेमस्वरूप आई)-3

उत्तर - रुपक अलंकार
(
) कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे
उत्तर - उपमा अलंकार

(
आ) पुढील शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

वात्सल्यसिंधु - वात्सल्याचा समुद्र

समास – षष्ठी तत्पुरुष समास

रूपरेखा –

समास

विद्याधन प्रतिष्ठा - विद्या,धन,प्रतिष्ठा यांचा समूह

समास – – समाहार द्वंद्व समास
विदेह - देह नसलेला

समास –ञ तत्पुरुष समास

अव्यक्त - व्यक्त न करण्यासारखे

समास –ञ तत्पुरुष समास
(
इ) वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आबाळ होणे - हेळसांड होणे
वाक्य - आईविना कवीचे आबाळ झाले
हेका न सोडणे - हाताने सोडणे
वाक्य - कवीचा जीव आई हवी आहे का सोडेना.
ब्रह्मांड आठवणे - खूप दुःख होणे
वाक्य - आईच्या वियोगाने कवीला ब्रम्हांड आठवले.
चित्ती ठसणे - मनात ठाम राहणे
वाक्य - आपल्या आईची मूर्ती आपल्या चित्ती ठसावी.

 

NAVAVI MARATHI 6.PREMSWARUP AAI (6.प्रेमस्वरूप आई)-2

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये

👇👇👇👇👇👇👇👇👇

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा 

 

          💠💠🏆🏆💠💠💠🏆

इयत्ता - नववी

मराठी प्रश्नोत्तरे

Click the below link

https://bit.ly/3IuNXV1

✡️e Samved व्हिडिओ✡️

Click the below link

https://www.smartguruji.in/2021/07/blog-post_16.html

मराठी व्याकरण सराव टेस्ट

      Click the below link

MARATHI VYAKARAN SARAV TEST (मराठी व्याकरण सराव टेस्ट) - www.smartguruji.in 

 

 

 

Related Post
KSEEB Class 10 English (3rd Language) 3.AUTUMN SONG
KSEEB Class 10 English (3rd Language) 3.AUTUMN SONG Class - 10 Subject - ENGLISH (3rd Language)Syllabus  -…
KSEEB Class 10 English (3rd Language) 4.The Noble Nature
KSEEB Class 10 English (3rd Language) 4.The Noble Nature 🌟 The Noble Nature – Poem Summary, Marathi Meaning, Glossary, A…
KSEEB Class 10 English (3rd Language) 1.FAITHFULL FRIENDS
KSEEB Class 10 English (3rd Language) 1.FAITHFULL FRIENDS  Class - 10 Subject - ENGLISH (3rd Language)Syllabus  -…
 Class 10 English (3rd Language) Poems – Simple Notes with Marathi Explanation
Class 10 English (3rd Language) Poems – Simple Notes with Marathi Explanation  🌟 Class 10 English (3rd Language) Poems – Simple Notes with Ma…
टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share